लोढा वर्ल्ड स्कूल तळोजा येथे संस्कृतभारती पश्चिम क्षेत्र व चंद्रकांत नारायण पाटकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक प्रशिक्षण वर्ग व प्रबोधन वर्ग या दोन आवासीय वर्गांचा उद्घाटन कार्यक्रम दिनांक 18 मे रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ वाणिज्य पत्रकार श्री. वैभव वझे यांच्या हस्ते झाले. तर चंद्रकांत नारायण पाटकर चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्री. गुरुदत्त तिरोडकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
लहानपणी शिक्षकांमुळे लागलेली संस्कृत भाषेची गोडी पत्रकारिता व वृत्त निवेदनात कशी उपयोगी पडली याबद्दल श्री. वैभव वझे यांनी आपल्या रंजक शैलीत मार्गदर्शन केले. श्री. गुरुदत्त तिरोडकर यांनी फार्मसी आणि आयुर्वेदाचे पर्यायाने संस्कृतशी असणारे नाते उलगडले. पाटकर ट्रस्टच्या शैक्षणिक सामाजिक उपक्रमांमध्ये व्यस्त असणारी ही तिसरी पिढी आहे असेही त्यांनी न्यासाच्या वतीने नमूद केले.
संस्कृतभारतीचे अखिल भारतीय श्लोक पठण केंद्राचे प्रमुख श्री. चिन्मय आमशेकर यांनी आपल्या भाषणात संस्कृत भाषेचा प्रचार हे सर्वांचेच दायित्व आहे याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संस्कृतभारतीच्या बारा दिवसांच्या या वर्गासाठी गुजरात मुंबईसह कोकण व गोवा येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र जमले आहेत. या निवासी वर्गातून प्रशिक्षण घेऊन पुढे सहभागी छात्र आपापल्या ठिकाणी संभाषण शिबिरासह अन्य संस्कृत उपक्रम चालवण्यास समर्थ होतील..
- Post By : Samskrita Barati Konkan
- |
- 18-05-2024
- |


























.jpeg)











.jpeg)























