Top
संस्कृतभारती - कोङ्कणम्
Latest Media & News
मुंबादेवी - प्रभादेवी संयुक्त जनपद संस्कृत संमेलन संपन्न

संस्कृतभारतीच्या मुंबादेवी व प्रभादेवी जनपदांचे संमेलन ब्राह्मण सभा चर्नी रोड मुंबई यांच्या सह संयुक्त विद्यमाने रविवार ४ फेब्रुवारी २०२४ रोजी ब्राह्मण सभा चर्नी रोड सभागृहात पार पडले. मुंबादेवी जनपदाच्या अध्यक्षा वैद्या अनुजा पुरंदरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मुंबादेवी जिल्हा संयोजिका श्रीमती विद्या आडिवरेकर यांनी जनपद संमेलनाचे प्रास्ताविक केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. राम करण यादव यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व सांगितले आणि संस्कृत संवर्धनासाठी शुभेच्छा दिल्या. ब्राह्मण सभेचे विश्वस्त श्री. श्रीधर देवधर यांनी संस्कृतभारती मधून संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले जे आपल्या भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी महत्वाचे आहे. संस्कृतभारतीचे पश्चिम क्षेत्र अध्यक्ष श्री.चंद्रशेखर वझे यांनी संस्कृतमध्ये संभाषणाची प्रेरणा दिली. या कार्यक्रमास मान्यवरांनी अवर्जून वेळ काढून नुसती भेट न देता लक्ष देऊन सत्रांमध्ये सहभागी झाले. काही नावे घ्यायची झाल्यास मध्यरेल्वेचे मुख्य जनसंपर्काधिकारी श्री. स्वपनील नीला माटुंग्याच्या रेल्वे प्रयोगशाळेचे श्री. डिगरसे संघाचे विभाग संघचालक रवींद्र संघवी उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव श्री. अतुल वझे राजभवनाचे मुख्य संपर्क अधिकारी श्री. उमेश काशीकर ब्रिच कॅंडी रुग्णालयाच्या डॉ. शिल्पा भोजराज उडपी रामनायक भोजनालयाचे श्री. सतीश नायक यांचा समावेश होता.

संस्कृतभारतीचे कोकणप्रांत संपर्कप्रमुख श्री. हरेश आमडेकर यांनी संस्कृतभारती संस्था आणि तिच्या कार्याचा परिचय करून दिला. संस्कृतभारती कोकण पत्राचार संस्कृचे प्रमुख डॉ. संदीप जोशी यांनी शिवराज्य शब्दकोशावर प्रबोधन केले. केंद्रीय संस्कृत विद्यापीठातून श्री. फणी प्रसाद यांच्या आधुनिक काळात शास्त्रग्रंथांचे महत्त्व या सत्रात संस्कृत शास्त्रांच्या अभ्यासामुळे आधुनिक काळात रोजगाराची संधी किंवा गुणवत्ता कशी सुधारू शकते हे सांगितले. ब्राह्मण सभेचे विश्वस्त डॉ. संजय गोडबोले यांनी संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी ब्राह्मण सभेद्वारा पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बालकेंद्र आणि देववाणीच्या विद्यार्थ्यांनी ध्येयमंत्र दीपमंत्र नृत्य कथा मजेदार लघु संवाद आणि लघुनाट्य सादर केले. गीता केंद्राच्या विद्यार्थ्यांनी ऐक्यमंत्र वैयक्तिक गीत व अनुगायन गीत गायले. गीता केंद्रातील विद्यार्थ्यांनी लघुनाट्याद्वारे संस्कृतमधून संभाषण करण्याचा संदेश दिला. संमेलनात संस्कृतभारतीच्या वस्तुप्रदर्शनी विज्ञान प्रदर्शनी आणि पुस्तक प्रदर्शनीचा लोकांनी अनुभव घेतला. प्रभादेवी संयोजिका श्रीमती स्मिता झणकर यांनी आभार प्रदर्शन केले. संस्कृतभारतीचे कोकण प्रांतमंत्री श्री. नीरज दांडेकर यांच्या भाषणात प्रत्येक घराघरात संस्कृत आणि प्रति व्यक्ती किमान एकाला संस्कृत शिकवा असे संकल्प देऊन उपस्थितांना प्रेरणा दिली. मुंबादेवी सहसंयोजिका श्रीमती श्रावणी तोडणकर यांनी जनपद संमेलनाचे सुसुत्र संचालन केले. मुंबादेवी आणि प्रभादेवी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी संमेलनाचा प्रचार संपर्क आणि संवाद साधण्याचे कार्य केले. मुंबादेवी आणि प्रभादेवी जिल्ह्यातील हे पहिलेच संमेलन असले तरी दीडशेहून अधिक जणांनी हजेरी लावली. संमेलनात 4500 रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. अशा कार्यक्रमांची आखणी करून संभाषण वाचन अध्ययन आणि अध्यापन करून संस्कृतभारतीचे काम करू असा संकल्प सर्वांनी केला.

जयतु संस्कृतम् जयतु भरतम्।.


  • Post By : Samskrita Barati Konkan
  • |
  • 19-02-2024
  • |