Top
संस्कृतभारती - कोङ्कणम्
Latest Media & News
वसई जिल्हा - संस्कृत संमेलन संपन्न

संस्कृत भारती कोंकण प्रांताचे वसई जनपदाचे संस्कृत संमेलन २८ जानेवारी २०२४ ला विरार पश्चिम येथील गोकुळ टाऊनशिप मध्ये असलेल्या मुलजीभाई मेहता आंतरराष्ट्रीय विद्यालयातील प्रांगणामध्ये संपन्न झाले. ह्या संमेलनाला मिरारोड ते खानिवडे ग्राम येथून संस्कृत प्रेमी अभ्यासक संस्कृत भारती कार्यकर्ते अशा जवळपास ७० अधिक नागरिकांनी उपस्थिती लावली. या संमेलनाचे सूत्र संचालन सौ. मिनल महन्ती यांनी केले.. संमेलनाचे उद्घाटन संस्कृतभारती कोंकण प्रांत विद्यालय कार्य प्रमुख श्री. नारायण वासुदेवन व वसई जिल्हा संयोजक श्री. किशोर उधोजी यांनी केले. उद्घाटन सत्रात प्रास्ताविकाद्वारे वसई जिल्ह्यात सुरु असलेल्या संस्कृतभारतीच्या कार्याविषयी संयोजकांनी माहिती दिली. त्यानंतर श्री. नारायण महोदयांनी संस्कृतभाषा आपल्या जीवनाशी कशी संबंधित आहे हे सोदाहरण स्पष्ट केले.

संमेलनाचे द्वितीय सत्र संस्थापरिचयाचे होते. सत्रस्वीकरता संस्कृतभारती कोकणप्रांत संपर्क प्रमुख श्री. हरेश आमडेकर यांनी संस्कृतभारतीच्या विविध आयाम व उपक्रमांची माहिती दिली. तसेच सत्राच्या शेवटी अध्यक्ष श्री. संजय महन्ती वसई जिल्हा शिक्षण प्रमुख ह्यांनी संस्कृतभारती विषयीचे आपले अनुभव सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विरार येथील गीतासोपान वर्गातील महिलांनी गृहे गृहे संस्कृतम् हे नाटक सादर केले. तसेच वसई नगरातील बालकेन्द्रातील बालकांनी सम्भाषण प्रदर्शन गीत - नृत्य असे कार्यक्रम सादर केले व सहज संस्कृतचा अनुभव श्रोत्यांना दिला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक ३५० वर्षपूर्ती या निमित्ताने श्री. चैतन्य पडळकर यांनी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभे करतांना राज्यशब्दकोष निर्माणासाठी संस्कृतभाषेचा पाया कसा स्वत्वासाठी महत्वपूर्ण आहे हे समोर आणले. सत्राध्यक्षा सौ. हेमांगी पांचाळ ह्यांनी संस्कृत संवर्धनाची गरज सांगितली. अंतिम सत्रात सम्मेलनाचे मुख्य वक्ता श्री. हरेश आमडेकर यांनी उपस्थित संस्कृतभारती कार्यकर्ता व संस्कृत प्रेमींना जीवनातील संस्कृतचे महत्त्व विषद करतांना संस्कृतमुळे आपल्या बोली भाषेची शुद्धता संस्कृतभाषेशी कशी निगडीत आहे हे सांगितले. संस्कृत भाषेचा प्रसार संस्कृतभारतीच्या उपक्रमांमधून वस्ती वस्तीपर्यंत नेण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यास सांगितले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली..


  • Post By : Samskrita Barati Konkan
  • |
  • 18-02-2024
  • |