Top
संस्कृतभारती - कोङ्कणम्
Latest Media & News
संस्कृत भारती ठाणे जनपद वार्षिकोत्सव-२०२५

संस्कृत भारती ठाणे जनपद वार्षिकोत्सव-२०२५
---------------------------------
समाजात संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसार करणा-या संस्कृत भारती संघटनेच्या विविध उपक्रमांपैकी एक आहे संस्कृत बालकेंद्र. ७ ते १३ वर्ष वयोगटातील मुलांसाठी आठवड्यातून एकदा एक तास चालवल्या जाणा-या ह्या बालकेंद्रांमध्ये वर्षभर संस्कृतमध्ये शिकवलेल्या गेलेल्या सुभाषिते गाणी गोष्टी विनोद नाटुकली खेळ इ. चे वार्षिकोत्सवामध्ये पालकांसमोर सादरीकरण केले जाते.

रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ठाण्यामध्ये चालणा-या एकूण १४ बालकेंद्यापैकी ७ बालकेंद्रांतील मुलांचे सादरीकरण ब्राह्मण सेवा संघ नौपाडा येथे झाले. संपूर्ण कार्यक्रमामध्ये ७७ मुलांनी सादरीकरण केले तर कार्यक्रम बघण्यासाठी मान्यवर अतिथींसह मुलांचे पालक संस्कृत भारतीचे कार्यकर्ते बालकेंद्र शिक्षिका इत्यादि मिळून २३० जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष मा. पुरुषोत्तम अगवण यांनी भूषविले. प्रसिध्द उद्याजक श्री. उदय मुठे हे अतिथी म्हणून तर संस्कृत भारतीचे कोकण प्रांत प्रचार प्रमुख श्री. महेश परळकरहे मुख्य वक्ता म्हणून उपस्थित होते. मुलांनी तयार केलेली संस्कृत चित्र-शब्द प्रदर्शिनी हा कार्यक्रमाचा आकर्षणबिंदू होता.

ठाण्यातील इतर ७ बालकेंद्रांचा वार्षिकोत्सव अरण्येश्वर स्भागृह कळवा आणि नालंदा विद्यालय ठाणे पूर्व येथे संपन्न झाला..


  • Post By : Samskrita Barati Konkan
  • |
  • 11-02-2025
  • |