Top
संस्कृतभारती - कोङ्कणम्
Latest Media & News
संस्कृत सम्भाषण शिबिराचा समारोप

21 जून पासून सुरु झालेल्या संस्कृत संभाषण शिबिराचा समारोप कार्यक्रम दिनांक ३० जून रोजी रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उच्चविद्याविभूषित श्री. कृष्णन संपत महोदय अतिथी म्हणून उपस्थित होते. तर संस्कृत भारती कोंकण प्रांताचे विद्यालयकार्य प्रमुख श्री नारायण वासुदेवन प्रमुख वक्ता होते. या बरोबरच ठाणे जिल्हा संयोजक महेश परळकर मानपाडा नगर संयोजिका गायत्री पाटील हे विशेषत्वाने उपस्थित होते.

सदरील संभाषण शिबिरात १६ जणांनी नियमीत उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला. केवळ १० दिवसात संस्कृत संभाषण कला आत्मसात करून विविध गीते माता-पुत्र संवाद आषाढी एकादशी निमित्त संवाद दिनचर्या गणेशोत्सवाविषयी माहिती पती-पत्नी संवाद भाजीविक्रेता-ग्राहक संवाद इ. सर्व संस्कृत मध्ये स्वतः तयार करून ते या कार्यक्रमात सादर केले. यामधून त्यांचा वाढलेला आत्मविश्वास दिसून येत होता.

याप्रसंगी शिबीर शिक्षिका दीप्ती रुक्केपुजारी यांनी शिबिराचे वृत्त सांगितले. वक्त्यांनी संस्कृत संवर्धन पुढील संस्कृत शिक्षण याविषयी मार्गदर्शन केले. तर अतिथी महोदय शिबिरार्थींचे प्रस्तुतीकरण पाहून भारावून गेले. या उपक्रमाचे संस्थेचे कौतूक करून शिबिरार्थींना प्रेरणा दिली.

एकात्मता मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली सर्वानी संस्कृत शिक्षणातील पुढील पायरी चढायचा यानिमित्ताने संकल्प केला..


  • Post By : Samskrita Barati Konkan-Thane
  • |
  • 03-07-2023
  • |