20 जानेवारी रोजी सुषमा पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कामोठे पनवेल येथे सायंकाळी 4 ते 7.30 या वेळेत रायगड विभाग सम्मेलन आयोजित करण्यात आली होती.
श्रीमती प्रज्ञा पाटील (प्राध्यापक सायन कॉलेज) या उद्घाटक व श्री. संदीप नेटकर (प्राचार्य सुषमा पाटील विद्यालय नाईट कॉलेज) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अखिल भारतीय प्रचार प्रमुख श्री. भेडसगावकर कोकण-प्रांतमंत्री श्री. नीरज दांडेकर आणि प्रांताचे गीताकेन्द्र प्रमुख श्री. कुमार भट उपस्थित होते.
उद्घाटन सत्रानंतर संस्कृतभारती संस्था परिचय सत्र श्री. कुमार भट यांनी तर शिवराज्याभिषेक विशेष सत्र रायगड विभाग संयोजक श्री. विक्रांत जोशी यांनी वक्ता म्हणून सादर केले.
सांस्कृतिक कार्यक्रम सत्रात बाल केंद्र देववाणी साप्ताहिक वर्ग पत्रद्वारा संस्कृत आणि गीता केंद्राचे विद्यार्थी यांनी विविध कलाकृती सादर करून सहज संस्कृतचे प्रात्यक्षिक सादर केले.
या सम्मेलनात ग्रंथ प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन आणि वस्तू प्रदर्शनाचा समावेश होता. संमेलनात लोकांनी पुस्तकांची खरेदीही केली.
कार्यक्रमाला पंचवीस कार्यकर्त्यांसह साठ जण उपस्थित होते.
श्री. शिरीष भेडसगावकर यांच्या पाथेय भाषणातील मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली..
- Post By : Samskrita Barati Konkan
- |
- 12-02-2024
- |


























.jpeg)











.jpeg)























