Top
संस्कृतभारती - कोङ्कणम्
Latest Media & News
संस्कृतभारती उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे संस्कृतसम्मेलन

संस्कृतभारती कोकणप्रान्त उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातर्फे रत्नामृतं संस्कृत सम्मेलन दापोली शहरातील दापोली अर्बन बॅन्क वरिष्ठ महाविद्यालयात रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी सम्पन्न झाले.
सम्मेलनास कोकण प्रान्त शिक्षण प्रमुख ऍडव्होकेट श्री. आशिष आठवले हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले.त्यांनी. छ.शिवाजी महाराजांनी संस्कृतसाठी केलेल्या कार्यसंबंधी व्याख्यान दिले. कोकण कृषि विद्यापीठातील दापोलीतील शास्त्रज्ञ माननीय श्री. डॉ. अमित देवगिरीकर सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रत्नागिरी विभागाचे विभाग संयोजक श्री. मनोहर काजरेकर यांनी संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले. दापोली एज्युकेशन सोसायटीचे संचालक ट्रस्टी माननीय श्री. आनंद करमरकर हे देखील संमेलनास पूर्णवेळ उपस्थित होते.
पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन व दिपमंत्राणे कार्यक्रमांची सुरुवात झाली.
बालकेन्द्रशिक्षिका कुमारी गायत्री पोंक्षे यांनी “अमृतवाणी संस्कृतभाषा नैव क्लिष्टा न च कठिना” हे संमेलन गीत सुस्वरात सांगून सर्वांकडून म्हणून घेतले. उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक श्री. मुकेश बामणे यांच्या हस्ते पाहुण्यांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुकेश बामणे यांनी आपल्या प्रास्ताविकातून पाहुणे तसेच उपस्थित संस्कृत प्रेमीचे स्वागत करून संमेलनाचे औचित्य विषद केले. त्यानंतर संस्कृत भारतीच्या जेष्ठ कार्यकर्त्या व डी. बी. जे. कनिष्ठ महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुखा डॉ. सौ. माधवीताई जोशी यांनी संस्कृत भारती संस्थेचा संस्थेच्या प्रचार प्रसार कार्याचा परिचय आपल्या मधुर वाणीतून करून दिला.
त्यानंतर दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित प्राध्यापक वा. ना. दांडेकर बालक मंदिर विद्याभारती विभाग तसेच ए. जी. हायस्कुल मधील मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात नृत्य विविध संस्कृत संवाद संस्कृत पोवाडा इत्यादी चा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लवेल हायस्कुल मधील संस्कृत शिक्षिका सौ. स्मिता सरदेसाई यांनी केले. ए. जी. हायस्कुल मधील संस्कृत शिक्षिका सौ. शर्वरी घाटे यांनी मान्यवरांचे तसेच संस्कृत प्रेमी नागरिक शिक्षक पालक सर्वांचे आभार मानले. शेवटी शान्तिमन्त्र होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. ।
संमेलनात संस्कृत विज्ञान प्रदर्शिनी संस्कृत वस्तु प्रदर्शिनी पुस्तक विक्री ई गोष्टी मांडलेल्या होत्या. सुमारे ९० लोक व ३५ विध्यार्थी संमेलनास आलेले होते..


  • Post By : Samskrita Barati Konkan
  • |
  • 22-02-2024
  • |