संस्कृत ही बोलीभाषा म्हणून जनमानसात पुन्हा प्रस्थापित होऊन शास्त्रीय जीवनशैली अद्यावतपणे लोकांना परिचित व्हावी यासाठी संस्कृतभारती गेली ४२ वर्षे अविरत कार्य करीत आहे. सध्या भारतासह पंचवीस पेक्षा अधिक देशात संस्कृत संभाषण शिबीर बालकेंद्र गीताकेंद्र पत्रद्वारा संस्कृत विद्यालय संस्कृत पाठ्यक्रम आणि स्तोत्रपठण अशा विविध उपक्रमांचे आयोजन वेगवेगळ्या वयोगटांसाठी संस्कृतभारतीचे कार्यकर्ते यथाशक्ती करीत असतात. विना-अनुवाद परस्पर पाठन पद्धतीमुळे सरळ सुलभ संस्कृत भाषेचा अनुभव घेऊन संस्कृत व्याकरणाची भीती दूर होतांना दिसून येते.
याखेरीज संस्कृतच्या प्रचार-प्रसारासाठी संस्कृतभारतीकडून जिल्हा - प्रांत - अखिल भारतीय अशा त्रिवर्षीय चक्रात संमेलने आयोजित केली जातात. यंदाचे वर्ष जिल्हा संमेलनांचे. येत्या महिन्याभरात मुंबई महानगर क्षेत्रात अशी आठ जिल्हा संमेलने निश्चित झाली आहेत. सर्व संस्कृत-प्रेमींनी आपल्या परिसरातील संमेलनाचा आनंद घ्यावा.
अधिक माहिती किंवा नोंदणीसाठी दिनांक आणि संपर्क क्रमांक खाली दिले आहेत.
१. रायगड विभाग - २०-जाने-२४ (८६९८४४५५८८)
२. ठाणे महानगर - २१-जाने-२४ (९७६९५४५७५८)
३. कल्याण-अंबरनाथ - २८-जाने-२४ (९९३०७७६०८७)
४. वसई - २८-जाने-२४ (८४४६५११५९२)
५. मुलुंड - २८-जाने-२४ (९८६९५२८३७५)
६. अंधेरी-कांदिवली (सहार/ओशिवरा/मार्वे) - ३-फेब-२४ (९९६९९२०८१६)
७. नवी मुंबई - ४-फेब-२४ (९८६७१६९४९५)
८. दक्षिण मुंबई-विले पार्ले - ४-फेब-२४ (९९८७८३३११६).
- Post By : Samskrita Barati Konkan
- |
- 11-01-2024
- |


























.jpeg)











.jpeg)























