दिनांक २८ जानेवारी २०२४ रविवार या दिवशी टिळक नगर विद्यालय डोंबिवली येथे संस्कृत संमेलन संपन्न झाले. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून गणेश मंदिराच्या अध्यक्षा सौ.अलका मुतालिक तसेच टिळक नगर शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह श्री. श्रीकांत पावगी संस्कृतभारतीचे पश्चिमक्षेत्राध्यक्ष श्री. चंद्रशेखर वझे उपस्थित होते. क्षेत्र संयोजक श्री. चिन्मय आमशेकर यांनी संस्कृतभारतीचा परिचय संभाषण व कथा माध्यमातून करून दिला. कोंकण प्रांताचे पत्राद्वारा प्रमुख श्री. संदीप जोशी यांनी शिवाजी महाराजांचा राज्य व्यवहार कोशात संस्कृत भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे यावर भाष्य केले.
संमेलनाच्या अनुषंगाने डिसेंबर महिन्यात गीतापठण 12 वा अध्याय अभिवाचन स्पर्धा व नाट्यस्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यातील विजेत्या नाटकांचे सादरीकरण व सर्व स्पर्धातील विजेत्या मुलांचा पारितोषिक समारंभ पुढील सत्रात पार पडला.
संस्कृत रंगभूमीवर अनेक उत्तमोत्तम प्रयोग करणारे डॉ. प्रसाद भिडे यांनी आपल्या सत्रात संस्कृतसाठी नाटक हा साहित्य प्रकार पूरक आहे असे प्रतिपादन केले.
संमेलनाच्या समारोप अध्यक्षा ॲड. सौ. चित्रा पाटकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. पाथेयभाषण संस्कृतभारतीचे क्षेत्राध्यक्ष श्री. चंद्रशेखर वझे यांनी केले.
या सर्व सत्रांंदरम्यान वैद्य श्री. मंगेश देशपांडे डॉ. अनिल बरनवाळ श्री. प्रमोद उंटवाले अशा स्वक्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी सत्राध्यक्ष म्हणून उपस्थित राहून संस्कृतभाषेप्रती असणारी आपली आपुलकी व्यक्त केली.
विज्ञानप्रदर्शिनी व वस्तुप्रदर्शिनीसह पुस्तकप्रदर्शिनीलाही उदंड प्रतिसाद मिळाला. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या संमेलनात प्रमुख कार्यकर्त्यांसह २०० हून अधिक संस्कृतप्रेमी उपस्थित होते..
- Post By : Samskrita Barati Konkan
- |
- 12-02-2024
- |


























.jpeg)











.jpeg)























